न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन

 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

‌राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरात स्थानापन्न केलेल्या नवदुर्गेचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे देखील दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होवो व शेतकऱ्यांना दिलासा मिळो, अशी प्रार्थना केली. जिल्ह्यातील दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी जिल्ह्यात किमान १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी ७ हजार बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. लवकरच उर्वरित बंधारे देखील बांधण्यात येतील त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दुष्काळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते पुखराज पुरोहित, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष तथा सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, सौ. मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, नंदू गावडे, विराग मडकईकर, कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सागर चव्हाण, गटनेते बाबुराव चव्हाण, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते संतोष गांवस, किशोर चिटणीस, कृष्णा धुळपणवार, बाळ चोणकर यांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक ग्रामस्थ महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे