न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे यश

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध मैदानी क्रीडा प्रकारात यश संपादन केले आहे. धावणे, लांब उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, थाळीफेक आणि रिले अशा विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले आहेत.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दत्ताराम गवस याने प्रथम, तर सत्यजीत हांडये याने द्वितीय क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावण्यात वर्धन मलिक, तर ६०० मीटर धावण्यात देवांश मुद्रस याने प्रथम क्रमांक मिळविला. लांब उडीमध्ये शेवन परेरा आणि गोळाफेकमध्ये विग्नेश आपके यांने प्रथम क्रमांक मिळवला.

४ × १०० मीटर रिले स्पर्धेत दत्ताराम गवस, देवांश मुद्रस, सत्यजीत हांडये, वर्धन मलिक आणि आयुष रावत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष चमक दाखवली. ३००० मीटर धावण्यात ध्रुव संदीप नाईक (इयत्ता ११ वी) याने प्रथम, तर आयुष प्रशांत चिरमुरे (इयत्ता ९ वी) याने द्वितीय क्रमांक मिळविला. १५०० मीटर धावण्यात रुद्र परेश सावंत (इयत्ता ११ वी) याने प्रथम क्रमांक मिळवला.

८०० मीटर धावण्यात ध्रुव संदीप नाईक याने प्रथम, तर अर्जुन सचिन कामती (इयत्ता १० वी) याने द्वितीय क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावण्यात तनिष्क महेश मुळीक (इयत्ता ११ वी) याने प्रथम, तर पार्थ दीपक नाईक (इयत्ता ११ वी) याने द्वितीय क्रमांक मिळवला.

२०० मीटर धावण्यात विनीत विनायक गवस (इयत्ता १० वी) याने प्रथम, तर ओम राजेंद्र गोसावी (इयत्ता ११ वी) याने द्वितीय क्रमांक मिळविला. १०० मीटर धावण्यात आर्यन गणेश वारेकर (इयत्ता १० वी) याने प्रथम क्रमांक मिळविला. तिहेरी उडीमध्येही आर्यन वारेकर याने प्रथम क्रमांक पटकावून आपले अष्टपैलू क्रीडाकौशल्य दाखविले.

१९ वर्षांखालील मुलांच्या गटात १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जय गावडे याने प्रथम, तर महादेव देवूलकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. २०० मीटर धावण्यात अशोक घोडके, ४०० मीटर धावण्यात वेदांत वातकर आणि १५०० मीटर धावण्यात रोहित कानसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

३००० मीटर धावण्यात नील हेगिष्टे याने तृतीय क्रमांक मिळविला. लांब उडी आणि तिहेरी उडी या दोन्ही प्रकारांत प्रज्वल यादव याने प्रथम क्रमांक मिळविला. गोळाफेकमध्ये ओंकार जाधव याने तृतीय, तर थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव श्री. जॉय डांटस, प्राचार्य श्री. नितीन गावडे, कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ, शिक्षकवृंद व क्रीडा प्रशिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे