केसरकरांच्या भाकरीवर उदरनिर्वाह करणारी माणसे आज पैसे घेऊन आंदोलने करतात.. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
जी माणसे काही वर्षांपूर्वी केसरकरांच्या भाकरीवर उदरनिर्वाह करत होती, तीच माणसे आज कोणाकडून तरी पैसे घेऊन आंदोलने करत आहेत. आमदार दीपक केसरकर यांच्यावर नाहक टीका करत आहेत. दीपक केसरकर यांचे वर्तन सर्व समाजाला माहित आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी असून उबाठाच्या लोकांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी आपली तोंडे आरशात पाहावी अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज सोमवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली
संजू परब म्हणाले, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे उभे आहोत. उबाठाच्या आंदोलनामुळे केसरकरांचे महत्त्व कमी होणार नाही. दीपक केसरकर हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले असून मंत्रीही झालेत. ते देवभक्त असून प्रत्येक देवळात ते जातात. केवळ फोटो आहे म्हणून कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे चुकीचे आहे. केसरकर यांना सावंतवाडीची जनता ओळखून आहे. उबाठाचे नेते तिथे गेले होते, उद्धव ठाकरेंनी खरातला पाणी दिले आहे असे श्री. परब म्हणाले.
धरुन पैसे देऊन आणलेली माणसे उबाठाच्या आंदोलनात असून मतदारसंघातील महिला दीपक केसरकर यांच्या पाठीशी आहेत. भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे असे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, क्लेटस फर्नांडिस, गुंडू जाधव, राकेश पवार, संजय गावडे, अर्जित पोकळे आदी उपस्थित होते.


