बकुळीची फुले” काव्यसंग्रहात दीपक पटेकर यांचे लेखन साहित्य अकादमीसाठी पात्र…. साहित्यिक डॉ. एच. व्ही. देशपांडे
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
आज जुन्या कवींच्या खांद्यावर उभे राहून नवे कवी जग पाहत आहेत. मात्र, मुक्तछंदच्या नावावर छंदमुक्त कविता लिहिली जात आहे. यात वृत्तबद्ध काव्य लिहिणाऱ्या कवी दीपक पटेकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांचे लेखन साहित्य अकादमीसाठी पात्र असून त्या दृष्टीने भविष्यात त्यांनी लेखनाची वाटचाल करावी असा सल्ला कोल्हापूर विद्यापीठाचे सिनेट मेंबर व साहित्यिक डॉ. एच. व्ही. देशपांडे यांनी दिला. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीतर्फे आयोजित कवी दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने आयोजित केलेल्या कवी दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सावंतवाडी येथील कवीवर्य केशवसुत कट्टयावर रविवारी सायंकाळी संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कवी विनय सौदागर, कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासकार डॉ. जी. ए. बुवा, साहित्यिका सौ. उषा प्रकाश परब, कोमसाप शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे स्वागत व परिचय भरत गावडे यांनी करून दिला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.जी. ए. बुवा यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. तर कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते मालवणी कवी विनय सौदागर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉक्टर देशपांडे पुढे म्हणाले, सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याच प्रतिबिंब ‘बकुळीची फुले’ या काव्यसंग्रहात दिसून येते. सावंतवाडीशी माझे वेगळे नाते आहे. कवीवर्य वसंत सावंत, बा. भ. बोरकर यांच्यासह येथील टी.एन. नाईक, दीनकर धारणकर, तात्या भांगले, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, ना.शि.परब, शशिकांत निखार्गे, दादा मडकर्ईकर, आ.द. राणे, विद्यार्थी महेश केळुसकर आदींसह मी या भूमीत काम केले. एस.पी. के. महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करतानाच्या १७ वर्षांच्या आठवणी आजही स्मरणात आहेत. कवी वसंत सावंत यांनी मला निसर्ग वाचायला शिकवला. जगाच्या इतिहासात काव्य हे पहिलं लिहिले गेले असून कवितेचा अन् मानवी जीवनाचा संबंध दृढ आहे. असे डॉ. देशपांडे म्हणाले.
यावेळी कवी दीपक पटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुस्तक निर्मितीसाठी प्रेरणा देणारे आपले वडील, काव्यगुरू विजय जोशी (विजो), प्रेरणास्थान मार्गदर्शक डॉ. जी. ए. बुवा, पुस्तक निर्मितीसाठी मदत करणारी आपली बहीण अपर्णा जाधव, कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कोमसाप शाखेच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले. मुक्तच्छंद कवितेकडून वृत्तबद्ध कवितांकडे आपण कसा वळलो हे सांगून त्यांनी पुस्तकाचा संपूर्ण प्रवास वर्णन कसा झाला हे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी विनय सौदागर म्हणाले, दीपक पटेकर यांच्यातील कवी आम्ही अनुभवला आहे. सोप्या शब्दात कवितेची मांडणी त्यांनी केली आहे. यमकांची विपुलता कवी पटेकर यांच्या लेखनात असून त्यांच्यात एक गीतकार दडलेला आहे. निसर्ग, प्रेमासह सामाजिक जाणीवांवर भाष्य करणारी काव्य त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या कवितांवरचा “कवितेचा दीपक” हा कार्यक्रम यापूर्वीच घेऊन आम्ही त्यांचा सन्मान केला आहे.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्यांकडून कवी दीपक पटेकर यांचा जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोमसापचे साहित्यिक अनंत वैद्य, संतोष वालावलकर, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सावंतवाडी शाखा उपाध्यक्ष अभिनंदन लोंढे, सचिव राजू तावडे, सहसचिव विनायक गावस, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, ॲड. नकुल पार्सेकर, रामदास पारकर, ऋतुजा सावंत भोसले, मेघना राऊळ, ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, निवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, कल्पना बांदेकर, ॲड. अरूण पणदुरकर, प्रा. सुभाष गोवेकर, सतीश पाटणकर, अभय नेवगी, किशोर वालावलकर, म. ल. देसाई, सुरेश पवार, अनिल भोसले, एकनाथ कांबळे, मुकूंद वझे, श्री. भाट, प्रा. सुरेश म्हसकर, प्रा. धीरेंद्र होळीकर, मधुकर मातोंडकर, दिलीप भाईप, विनायक पराडकर, जितू पंडित, विठ्ठल कदम, प्रदीप प्रियोळकर, संदीप सावंत, व्ही.के.सावंत, वैशाली सावंत, डॉ.सुनील परब, आदिती मसुरकर, धोंडी मसुरकर, स्नेहा नारिंगणेकर, धोंडू नारिंगणेकर, प्रितम तिवरेकर, वैभवी हरमलकर, , राजा घाटे, रवी जाधव, प्रा.रूपेश पाटील, प्रा. केदार म्हसकर, कल्पना बोडके, साबाजी परब, राजेश नाईक, प्रा. गोडकर, प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, बाळकृष्ण राणे, मोहन जाधव, प्रशांत कासकर, संदीप कांदे, शेखर जाधव, नेपोलियन डिसोझा, आश्लेषा पारकर, विनीता सातार्डेकर, सुमती कासकर, विघ्नेश सातार्डेकर, मिहिर कासकर, नूतन पावसकर, महेश खानोलकर, परेश परब, प्रसाद परब, वैभव पारकर, सौ.सौदागर, पूजा पटेकर, मोहिनी पटेकर, परशुराम पटेकर, भूमी पटेकर, निमिष पटेकर आदी पटेकर कुटुंबीय, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव विनायक गांवस यांनी केले. तर आभार सचिव राजू तावडे यांनी मानले.


