न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कर्जदार महिलेचे अपहरण करून विवस्त्र करीत मारहाण.. तिघांना अटक

बेंगळुरू/ विनूथा के आर 

 कर्ज वसुलीसंदर्भात खाजगी सावकार आणि ॲप्सकडून होणाऱ्या छळाच्या अनेक घटना आपण ऐकल्या अथवा वाचल्या असतील. मात्र, कर्नाटकातील बंगळुरु येथून अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने घेतलेले कर्ज आणि त्यावर लागलेले व्याज वेळेत न चुकवता आल्याने, तिचे अपहरण करण्यात आले.

तिला प्रचंड मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर, तिला विवस्त्र करुन आणि तिचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तीन आरोपींना अटक केली आहे.

पीडित महिलेने गेल्या दोन वर्षांपूर्वी रेश्मा बानू नावाच्या एका महिला आरोपीकडून 1 लाख रुपये उधार घेतले होते. यानंतर रेश्माच्या मध्यस्थीने नाजत नावाच्या आणखी एका आरोपीकडून 50000 रुपयांचे कर्ज घेतले होते.”
मात्र, आर्थिक चणचणीमुळे पीडित महिलेला गेल्या 6 महिन्यांपासून व्याजाची रक्कम आणि 2 महिन्यांपासून कर्जाचे हप्ते भरणे शक्य झाले नाही. मात्र, सततच्या फोनला कंटाळून तिने आरोपी रेश्माचा नंबर ब्लॉक केला होता आणि ती तिच्या आईच्या घरी राहण्यास गेली होती.

कामाचे आमिष दाखवून बोलावले अन्…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजतने संबंधित पीडितेला काम देण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले. तेथे रेश्मा बानू आणि तिचा पती सुहेलही पोहोचले. या तिघांनी मिळून महिलेला प्रचंड मारहाण केली. आरोपानुसार, यानंतर, चाकूने हल्ला करुन तिला जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि अपहरण करुन कुंबलगोडू येथील एका घरात डांबून ठेवले.

दरम्यान, महिलेच्या आईने ‘चंद्रा लेआऊट’ पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि बंधक महिलेची सुटका केली. या अमानुष प्रकरणात पोलिसांनी रेश्मा बानू, नाजत आणि रेश्माचे पती सुहेल या तिघांना अटक करण्यात आली.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे