लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ… मंदीरांना धोका
बुलढाणा/ प्रतिनिधी
जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवरातील पाणीपातळीत गेल्या सहा महिन्यांत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे परिसरातील प्राचीन मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी सरोवराची पाहणी केली; मात्र त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देणे टाळले… दरम्यान, जिल्हाधिकारी किरण पाटील यांनीही ठोस भूमिका न मांडता सर्वसाधारण उत्तरे दिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाढती पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सरोवरात येणारे गोडे पाणी अडवून ते बाहेर काढण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली”


