न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी श्री दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळ्याचे आयोजन

​सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी उभाबाजार येथील श्री दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात ‘श्री हनुमान जन्मोत्सव’ सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ३१ मार्च ते शनिवार, ४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, उभाबाजार हनुमान मित्रमंडळाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.
​गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी (मुख्य दिवस): सकाळी ८:०० वाजता मुख्य ‘श्री हनुमान जन्म व कीर्तन’ सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी ३:०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, रात्री ८:०० वाजता महाप्रसाद आणि ८:३० वाजता भजनाचा कार्यक्रम होईल.
​शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी सोहळ्याची सांगता. रात्री ८:०० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत, चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांच्या ‘पतिव्रत्यतेज’ अर्थात ‘महिमा शिवचक्र तीर्थाचा’ या ट्रिकसिनयुक्त नाट्य कलाकृतीने होईल.
​उभाबाजार हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी सर्व भाविकांना या सर्व कार्यक्रमांचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे