बांदा येथे हनुमान जयंतीनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम
सिंधुदुर्ग / राजू तावडे
बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उत्सवाच्या पुर्वसंध्येला बुधवार दि. १ एप्रिल रोजी रात्रौ ठिक ७.३० वाजता स्थानिकांच्या पारंपरिक वार्षिक भजनसेवेने उत्सवाचा आरंभ होईल.
बुधवारी रात्री १०.०० वा. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ ,कवठी यांचा ‘शौरी भीषण’ हा पौराणिक नाट्यप्रयोग
सादर होईल.
गुरूवार दि. २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ठीक ६.०० वाजता श्री हनुमान जन्म सोहळा होऊन पारंपारिक श्री हनुमान फेरीला आरंभ होईल. सायं. ठीक ४.००वा.श्री रामनाम जप होणार आहे. यात भाविकांनी सहभाग घ्यावा. सायं. ठीक ५ ते ६.०० वा. श्री विठ्ठल सोहिरा महिला भजनसेवा मंडळ ,बांदा यांची भजनसेवा होईल. सायं. ठीक ७.३० वा. प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. कैलास खरे ,रत्नागिरी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान सेवक मंडळ ,बांदा आणि सिद्धेश विनोद शिरोडकर यांनी केले आहे.


