न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी वैश्यवाडा हनुमान जन्मोत्सवाला वारकरी दिंडी कार्यक्रम

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

वैश्यवाडा, सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने दिनांक 2 एप्रिल रोजी देवगड तालुक्यातील किंजवडे परबवाडी येथील श्री पावनाई देवी प्रासादिक मंडळाचा आगळा वेगळा वारकरी दिंडीचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक 1 एप्रिल पासून हनुमान जन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा, दिनांक 2 रोजी हनुमान जन्मोत्सव दिवशी सकाळी 8 वाजता सौ. ललीन तेली यांचे सुश्राव्य कीर्तन, श्री हनुमान जन्मोत्सव, दुपारी 3 वाजता श्री सत्यनारायण महापुजा, सायंकाळी तळवडे कुलदेवता प्रासादिक भजन यांचे भजन, रात्री 9 वाजता किंजवडे देवगड येथील वारकरी दिंडी, या दिंडी मध्ये सुमारे 50 वारकरी सहभागी होणार असून विविध देवांची रुपे सादर केली जाणार आहेत. जिथे हरी भजनाचा रंग, तिथे नाचतो पांडुरंग ही या कार्यक्रमाची संकल्पना रहाणार आहे.
तसेच श्री हनुमान जन्मोत्सवच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 3 एप्रिल रोजी शुभम धुरी यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम व त्या बरोबर वैश्यवाड्यातील कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाना उपस्थित रहावे, असे आवाहन श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे