न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पदाधिकाऱ्यांनी “मालवणी करंडकाचे” सातत्य ठेवावे …. आमदार दिपक केसरकर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

मालवणी भाषेत गोडी आहे. त्यामुळे ती सर्वांना आपलेसे करते. मालवणी करंडकच्या माध्यमातून कै.दिनकर धारणकर यांच्या नंतर नाट्य कलेत पडलेला खंड मालवणी करंडकच्या माध्यमातून पुढे सुरू झाला याचा मला अभिमान आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांनी यात सातत्य ठेवावे, जेणे करुन दरवर्षी पुण्या, मुंबईचे स्पर्धक या ठिकाणी येतील. असे मत माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी मांडले.
‌‌ओंकार कलामंच, सावंतवाडी आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या “मालवणी करंडक महोत्सवा”ला श्री. केसरकर यांनी सोमवारी शेवटच्या दिवशी भेट दिली. यावेळी जेष्ठ रंगकर्मी कै. आबा नेवगी यांच्या स्मरणार्थ उद्योजक चेतन नेवगी यांनी पुरस्कुत केलेला पुरस्कार कुडाळ येथील नाट्य कलाकार अंकुश कुभांर आणि जेष्ठ रंगकर्मी कै. दिनकर धारणकर यांच्या स्मरणार्थ हर्षवर्धन धारणकर यांनी पुरस्कुत केेलेला पुरस्कार वेंगुर्ले-आसोली येथील दशावतार कलाकार आनंद नार्वेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्री.केसरकर पुढे म्हणाले, अमोल टेंबकर आणि रुजूल पाटणकर यांच्यासह त्यांच्या टिमच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तूत्य आहे. श्री. बबन साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम चांगला झाला आहे, असे सांगुन त्यांनी सर्व टिमचे कौतुक केले. मालवणी भाषा रुजावी, बोलली जावी, यासाठी सुरू असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे. या स्पर्धेत सातत्य राहील्यास पुणे, मुंबई येथील एकांकिका या ठिकाणी येतील, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेेळी श्री. साळगावकर, टेंबकर व पाटणकर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ओंकार डान्स अ‍ॅकेडमीच्या पुजा पारधी, विश्व डान्स अ‍ॅकेडमीचे तुळशीदास आर्लेकर, जानू डान्स अ‍ॅकेडमीच्या जान्हवी सारंग, स्वराज्य अ‍ॅकेडमीचे हर्ष जाधव, माजी नगरसेवक गोविंद वाडकर, परिक्षक कुणाल मसाले, कृृष्णा सावळ, सतिश पाटणकर, सानिका पडवळकर, वैभव केंकरे, प्रशांत मोरजकर आदींचा सन्मान करण्यात आला.
यावेेळी सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर, आनंद काष्टे, निखिल माळकर, सौ.सावली पाटकर, प्रशांत सावंत, हेमंत पागंम, सौ. आर्या टेंबकर, ओम टेंबकर, सौ. आराध्या मोरजकर, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिध्देश नेरुरकर, हर्ष जाधव, अक्षय माशाळ, सौ.अंकिता काष्टे, शंशाक काष्टे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे