न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत टेनिस कोर्ट रुंदीकरणासाठी जुन्या झाडांची कत्तल

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी नगरपरिषदे कडून टेनिस कोर्ट रुंदीकरणाच्या नावाखाली सावंतवाडी जिमखाना मैदानावरील जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडी येथील क्रीडाप्रेमी नागरीक व सामान्य नागरिकांमध्येर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी या कृत्याचा निषेध केला आहे.
सावंतवाडी जिमखाना मैदान येथे लाँग टेनिस कोर्ट रुंदीकरणाचे काम नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम करत असताना या टेनिस कोर्टला लागून असलेली जुनी व खेळाडू, प्रेक्षक व नागरिकांना सावली देणारी झाडांची प्रशासनाने कत्तल केली असून नगरपरिषदेच्या या बेजबाबदार कृतीविरुद्ध जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. धनधांडग्या काही मुठभर व्यक्तींसाठी या झाडांवर कुऱ्हाड चालवल्यामुळे पालिकेच्या या कारभारावर जिमखाना मैदान येथे येणाऱ्या नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नव्याने सत्तेत आलेल्या कारभाऱ्यांनी विकास जरूर करावा मात्र तो करत असताना नैसर्गिक संपदा जपावी. एक झाड लावून ते मोठे होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जावा लागतो. मात्र कोणतेही सबळ कारण नसतांना हि उभी असलेली झाडे क्षणात तोडून परिसर भकास करणे म्हणजे विकास नव्हे याचे भान राखावे अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी व्यक्त करत तीव्र निषेध केला आहे. सावंतवाडी शहरात नगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे.मात्र हे अभियान राबविताना वर्षानुवर्ष सावली देणारी जुनी झाडे तोडून आपण वसुंधरा कशी काय टिकवणार ? असा सवाल मनसे तर्फे करण्यात आला आहे. लाँग टेनिस खेळणाऱ्या काही ठराविक व्यक्तींसाठी या झाडांचा बळी देण्याची आवश्यकता नव्हती. हि झाडे वाचवून टेनिस कोर्ट आणखी अद्ययावत करता आले असते. मात्र तसे न करता या झाडांचा बळी दिला व मैदान परिसरात असलेली नैसर्गिक सावली व नष्ट केली असा आरोप ॲड. केसरकर यांनी केला आहे.
यावेळी अमेय तेंडोलकर, राजू भालेकर, महेश डोंगरे, पिंट्या गावडे, सतीश आकेरकर, गौरव केसरकर, नितीन सावंत, अमित सावंत, अतुल केसरकर, दिपक केसरकर, अमरेश आसोलकर, रोहन लाखे, विजय लाखे, रोहन पाटील, अमित लाखे व इतर क्रीडाप्रेमी नागरीक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे