न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पाणीपुरवठा विभाग सभापती प्रतीक बांदेकर यांचा सभापती पदाचा राजीनामा

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्यावर झालेल्या चुकीच्या आणि बिनबुडाच्या आरोपांमुळेच आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी आज आयोजित पालिकेच्या सभेत उघडपणे जाहीर केले.
दरम्यान नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून शुक्रवारी झालेली नगरपरिषदेची सभा सुरुवातीलाच वादळी ठरली. बांदेकर यांचा राजीनामा स्वीकारा, अन्यथा आम्ही सभेवर बहिष्कार टाकू, असा थेट इशारा देत शिंदे शिवसेनेचे नगरसेवक संजू परब व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी सुरुवातीलाच सभागृहातून सभात्याग केला.
​ शिवसेना नगरसेवकांच्या या सभात्यागावर बोलताना सभापती सुधीर आडिवरेकर यांनी जोरदार पलटवार केला. नगरपालिका संकुलातील गाळ्यांच्या विषयात आपण स्वतः अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट दिसू लागल्यानेच श्री. संजू परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी सभात्याग करून काढता पाय घेतला, असा आरोप त्यांनी केला. तर सत्ताधारी नगरसेवक आनंद नेवगी यांनीही, गाळ्यांचा विषय बाहेर येऊ नये म्हणून हे सर्व नगरसेवक सभागृहातून पळून गेले, अशी टीका केली.
​अजेंड्यावरील विषयांवर चर्चा होण्यापूर्वीच अशा प्रकारे सभागृहाचा त्याग करणे योग्य नाही, असे मत विरोधी गटाचे नगरसेवक तौकीर शेख व देवा टेमकर यांनी मांडले. नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी देखील या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहाचा असा अनादर करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले, तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी यासंदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची सूचना सभागृहाला केली.
​ ​मिळालेल्या माहितीनुसार, बांदेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला राजीनामा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. मात्र, आज पार पडलेल्या नगरपालिकेच्या बैठकीत त्यांनी स्वतः याबाबतची अधिकृत घोषणा केली.​सभेत बोलताना प्रतीक बांदेकर म्हणाले, “माझ्या कार्यकाळात पाणीपुरवठा विभागाचे काम सुरळीत ठेवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर चुकीचे आणि गैरसमजातून आरोप केले जात आहेत. या नाहक आरोपांमुळे व्यथित होऊन मी दोन दिवसांपूर्वीच सभापती पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असे बांदेकर यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे