न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम, युवा नेते विशाल परब 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत, असे मार्गदर्शन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी विद्यार्थ्यांना केले.

कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि विशाल परब मित्र मंडळ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे दहावी, बारावी व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसेच मुख्याध्यापक, प्राचार्यांचा सन्मान सोहळ्याचे हि आयोजन यावेळी करण्यात आले होते. यावेळी श्री. विशाल परब हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या सोहळ्यास प्राचार्य गोस्वामी (खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला), श्री.दयानंद कुबल (अध्यक्ष, कोकण कला व शिक्षण विकास संस्था), नगराध्यक्ष श्री. राजन गिरप, उपनगराध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, डॉ. सचिन परुळेकर (अध्यक्ष, वेताळ प्रतिष्ठान), श्री. विवेक तीरोडकर (सचिव, वेताळ प्रतिष्ठान), श्री. समीर कुडाळकर, नगरसेवक श्री. सचिन शेट्ये, श्री. रवींद्र परब (सामाजिक कार्यकर्ते), श्री. युवराज जाधव, कु. रिया केरकर आणि कु. गौरी माईनकर रवी शिरसाट उपस्थिती होते.

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विशाल परब यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे