न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले… लगतच्या गावांना खबरदारीचा इशारा… भंडारा, गोंदियासह नांदेडात पाऊस

भंडारा/ वृत्तसंस्था

भंडारा जिल्हा आणि लगतच्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या या पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याचा वाढता साठा नियंत्रणात आणण्यासाठी धरण प्रशासनाकडून आता सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून १ लाख ३५ हजार ६९१ क्युसेक वेगाने वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे वैनगंगा नदीकाठच्या सर्व गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे

नांदेड शहरासह काही भागात सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. अर्धातासापासून पडत असलेला पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे. या पावसामुळे पहिल्यांदाच नद्या, नाले भरुन वाहणार आहेत. जलसाठे भरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे