न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोंकण सौंदर्याने नटलेला : कुशल बद्रिके

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 कोकणात एवढे सौंदर्य आहे की, ते मॉरिशसमध्येही नाही. त्यामुळे येथील तरुणांनी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपले करिअर करावे. कोकणच्या घराघरात कला आहे. साधी गणपती आरती आणि भजनातूनही ही कला दिसून येते. कोकणाला सांस्कृतिक वारसा लाभला असून, येथील पाण्याची चवही वेगळी आहे. या ठिकाणी मी जन्मलो असतो तर मला नक्कीच आणखी बरे वाटले असते, अशी प्रतिक्रिया सिनेअभिनेते कुशल बद्रिके यांनी व्यक्त केली.

सावंतवाडी भाजप व संदीप गावडे मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित **‘सुंदरवाडी दहीहंडी महोत्सव २०२६’**च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते झाले.

यावेळी बद्रिके म्हणाले की, भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण केले जात असल्याचा आपल्याला अभिमान आहे. जिल्हा परिषद शाळांवर सोलर सिस्टिमचा उपक्रम, गोरगरीब मुलांना वह्या वाटप तसेच भजन कलेला प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेले उपक्रम स्तुत्य आहेत.

कलाकारांना घडविण्यासाठी पुन्हा सिंधुदुर्गात येणार

संदीप गावडे यांच्या सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी तसेच येथील कलाकारांना शिकविण्यासाठी आगामी काळात आपण पुन्हा सिंधुदुर्गात येणार असल्याचे कुशल बद्रिके यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला युवा नेते विनोद राऊळ, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, मोहिनी मडगावकर, पंकज पेडणेकर, रवींद्र मडगावकर, संदीप गावडे यांचे वडील एकनाथ गावडे, सौ. गावडे, जितेंद्र गावकर, उपसभापती गौरव मुळीक, दादा परब, अनिकेत आसोलकर, साईनाथ हनपाडे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे