न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गिलच्या द्विशतकासह रोहीतच्या शतकामुळे भारताचा इंडीजवर विजय… केला ४०६ धावांचा पाठलाग

गुवाहाटी/ वृत्तसंस्था

भारत आणि वेस्ट इंडिजध्ये दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये कॅरेबियन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० ओव्हरमध्ये ४०५-७ धावा केल्या होत्या. जॉन कॅम्पबेल १०१ धावा, शाय होप १०४ आणि अमीर जांगू ११४ धावा करत तिघांच्या शतकाच्या जोरावर विंडिजने पहिल्यांदाच वनडे मध्ये ४०० धावांचा आकडा पार केला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी दमदार फलंदाजी केली.  कॅप्टन शुभमन गिलने द्विशतक  आणि रोहित शर्मा  शतक करीत  . भारताला विजय मिळवून दिला.

सुरूवातीला सावध पवित्रा घेतला आणि त्यानंतर सेट झाल्यावर दोघांनीही धुलाई करायला सुरुवात केली. शुभमन गिलने ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने १० चौकार आणि ५ षटकार मारले असून अजूनही नाबाद आहे. शुभमन गिलचे ११ शतक असून त्याचे हे सलग तिसरे शतक ठरले आहे. पहिल्या वनडे सामन्यातही शुभमनने ११० धावांची खेळी केली होती. या शतकासह शुभमन गिलने भारतात वनडेमध्ये २००० धावा पूर्ण केल्यात. सुरूवातीला रोहितपेक्षा शुभमन मागे होता पण त्याने अंदाज घेतला त्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला होता.

रोहित शर्मानेही शतकी खेळी करताना आपला वनडेमधील १२००० धावांचा टप्पा पूर्ण केला. रोहितने ७२ चेंडूत आपले शतक करताना १० चौकार आणि ६ षटकार मारत आपले ३५ वे शतक पूर्ण केले. या खेळीमध्ये रोहितने आपला सर्व अनुभव पणाला लावत हे शतक पूर्ण केले . शतक झाल्यावर रोहित १ धाव कढून आऊट झाला. रोहितने ७५ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. रोहितने या सामन्यात आपले २०० वनडे षटकार पूर्ण केले आहेत. त्यासोबतच एकाच देशात २०० पेक्षा जास्त वनडे षटकार ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज बनला आहे. रोहित बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाने  नाबाद (३१) धावांची खेळी करीत गिलसह (२२३) विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलचने १३३चेंडुत  ८षटकार आणि २५चौंकारासह दुसरे द्विशतक केले आहे.भारताने ३९ चेंडू आणि ८ गडी राखून विजय मिळवला.

आयसीसी वर्ल्ड कप २७ चे वेळापत्रक उद्या रात्री ८.३० वाजता जाहीर होणार आहे .

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे