न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोकणातील कबुलायतदार जमिनींचा प्रश्न डिसेंबरपूर्वी मार्गी लावणार – महसूलमंत्री बावनकुळे

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे, चौकुळ, नेने, मासुरे आणि केगद गावांमधील दीर्घकाळ प्रलंबित कबुलायतदार गावकर जमिनींचा प्रश्न डिसेंबरपूर्वी मार्गी लावण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. याविषयी नुकतीच मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या बैठक संपन्न झाली. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी हे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांना दिले.

या गावांतील ४ हजार ७१८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करून त्यांना ‘वर्ग १’ धारणाधिकाराने प्रत्यक्ष ताबा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. वनविभाग व खासगी वन आरक्षणामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गेळे येथील २६९ कुटुंबांची अंतिम यादी निश्चित असून, २५३ पात्र कुटुंबांना व्यावसायिक प्रयोजनासाठी भूखंड वाटप पूर्ण झाले आहे. चौकुळ, नेने व मासुरे प्रकरणांतील न्यायालयीन अडचणींवर ही सकारात्मक मार्ग काढण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे