न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

प्राथमिक शिक्षक पतपेढी, दोडामार्ग ५५ लाखांच्या अपहार प्रकरणी सुनील भागवतसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजलेल्या प्राथमिक शिक्षक पतपेढी, शाखा दोडामार्ग येथील सुमारे ५५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि तत्कालीन शाखाधिकारी सुनील भागवत यांच्यासह सर्व संशयित आरोपींची आज निर्दोष मुक्तता केली.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या दोडामार्ग शाखेत सुमारे ५५ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा ठपका ठेवत तत्कालीन शाखाधिकारी सुनील भागवत आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात दोन स्वतंत्र खटले न्याय दांडाधिकारी( प्र. व) दोडामार्ग न्यायालयात चालवले जात होते. आरोपींच्यावतीने ॲड. परिमल नाईक यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. दोन्ही खटल्यांमधील तांत्रिक मुद्दे आणि पुराव्यांचा अभाव न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात बचाव पक्षाला यश आले.
या कायदेशीर लढाईत ॲड. परिमल नाईक यांंना ॲड. विश्राम घोगळे, ॲड. सुशील राजगे, ॲड. रश्मी नाईक, ॲड. अमिषा बांदेकर यांनी सहकार्य केले. दोन्ही खटल्यांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायदंडाधिकारी ( प्र.व) दोडामार्ग, श्री. वाय. पी. बावकर यांनी सुनील भागवत आणि इतर सर्व आरोपींना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे