कोकणवासियांना सुख समृद्धीसाठी विशाल परब यांच्याकडून देव वेतोबाला सपत्नीक साकडे
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
देव वेतोबा, कोकणवासियांना सुख समृद्धी लाभू दे, असे साकडे भाजप युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक श्री देव वेतोबाचे दर्शन घेत घातले.
कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री देव वेतोबा चरणी आज युवा नेते विशाल परब यांनी पत्नी सौ. वेदिका यांच्यासह नतमस्तक होत दर्शन घेतले. यात्रेच्या निमित्ताने घेतलेल्या दर्शनात त्यांनी कोकणातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले.
वेतोबाच्या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी मांदियाळी होती. दर्शनानंतर विशाल परब यांनी उपस्थित भाविकांशी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. कोकणातील प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी आणि आनंदी राहावा, तसेच समाजात सदैव ऐक्य, शांतता आणि प्रगती नांदावी अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आरवली आणि परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आरवलीचे सरपंच समीर कांबळी, सरपंच, सागर तीर्थ एकनाथ कुडव, माजी सरपंच, शिरोडा मनोज उगवेकर, माजी सरपंच, आरवली तातोबा कुडव, मंदिर कमिटी सदस्य प्रसाद साळगावकर, किरण पालयेकर, मिलिंद साळगावकर आणि मयूर आरोलकर उपस्थितीत होते.


