न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नळ पाणी योजनेच्या कामामुळे काही ऐन उन्हाळ्यात जनता पाण्यापासून वंचित, संजू परब

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

शहरातील गॅस पाईपलाईन व नळ पाणी योजनेच्या कामामुळे काही भागातील जुन्या पाण्याच्या लाईन फुटल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. नगराध्यक्षांनी याकडे लक्ष देण आवश्यक होत.‌मात्र, केवळ वेळ बदलून पाण्याची समस्या सुटणार नाही. पावसाळ्यात हीच परिस्थिती राहणार असून ४ दिवसांत नळपाणी पाईपलाईन दुरुस्ती न केल्यास नागरिकांसह घागर घेऊन नगरपरिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
श्री. परब म्हणाले, अनेक नागरिकांनी पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधून देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. सावंतवाडी शहरातील पाण्याची आजची गंभीर परिस्थिती पाहता पावसात देखील हीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे ४ दिवसात दुरुस्ती होऊन लोकांना पाणी न मिळाल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढला जाईल असे श्री. परब म्हणाले.
दरम्यान, काही प्रभागात चार-चार दिवस झाले पाणी येत नाही. काही भागात लोकांना गढूळ जंतूयुक्त पाणी येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झालेत आहेत. पाईपलाईन फुटल्याने हे प्रकार वाढत आहे. ५७ कोटीच्या नळपाणी योजनेच काम हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हावे अशी मागणी शिवसेनेने सभागृहात केली होती. मात्र, याकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार तक्रार करून देखील प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे महिलांना घागर घेऊन मोर्चा काढल्याशिवाय आता पर्याय नाही असे मत नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केले. यावेळी यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड.सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, क्लेटस फर्नांडिस, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे