न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मळगाव घाटीत कार दरीत कोसळली .. सातजण जखमी, मधमाशांचा हल्ला

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी मळगाव घाटीत आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास इको कारचा भीषण अपघात झाला. धार्मिक सोहळा आटोपून सावंतवाडी येथे परतणाऱ्या शहरातील शिरसाट कुटुंबाची कार डी. के. टुरिझम जवळ थेट वीस फूट दरीत कोसळली. या अपघातात ७ जण जखमी झाल्याची माहिती समजते.
घाटीतील वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. मात्र झाडावरील मधमाशांनी हल्ला चढवल्याने काहीजण जखमी झालेत. या गाडीतील प्रवाशांना गंभीर इजा झाल्या आहेत. गाडीतील रजत मंगेश शिरसाट (वय 68), श्रीधर रंजन शिरसाठ (वय30), जयश्री विश्वनाथ शिरसाठ (वय 65), हर्ष महेश शिरसाठ (वय १८), उमा मंगेश शिरसाठ (वय 56), मंगेश महेश शिरसाठ (वय ६०), रंजन शिरसाट (वय 63) सर्व. राहणार सालाईवाडा सावंतवाडी हे सात प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघात घडल्यानंतर स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य सुरू असतानाच झाडावरील मधमाशांचे पोळ चाळवले. मधमाशांनी हल्ला चढवलेला असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावलेल्या युवकांनी जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरूच ठेवले. या भीषण अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये, सचिन हरमलकर, राजू परब, गणेश पेडणेकर आदींनी युद्धपातळीवर मदत कार्य केले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. लोहकरे, सुरेश पाटील, श्री. शिंगाडे, संभाजी पाटील, श्री.मोरबाळे आदी करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे