घावनळेत गुरूवर्य दादा गवस यांचा ५५ व्या अभिष्टचिंतन सोहळा उद्या साजरा होणार
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
घावळनेतील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक गुरूवर्य श्री. दादा गवस यांच्या ५५ व्या वाढदिवसा निमित्ताने ॐ श्री सदगुरू स्वामी समर्थ जगदमाता परीवारातर्फै विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथून स्वामींच्या मूळ चर्म पादुकांचे आगमन गुरुवार २१ मे रोजी सकाळी होणार आहे. सकाळी सात वाजता पादुकांवर अभिषेक व पादुका पुजन व दर्शन, सकाळी ११.३० वाजता स्वामींची महाआरती व महानैवेद्य, दु. १२ वाजता चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज वेदमूर्ती श्री नितीन महाराज पुजारी आणि ब्राम्हवृंद यांच्या उपस्थितीत गुरूवर्य श्री दादा गवस यांचा५५ वा अभिष्टचिंतन सोहळा. दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ६ भजन , कीर्तन सायंकाळी ७ वाजता बुवा श्रीकांत शिरसाठ व संदीप पुजारे यांची डबलबारी व रात्री ८ वाजता महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन परीवारातर्फे करण्यात आले आहे.


