डिचोली महिला खून प्रकरणात गोवा पोलीस सावंतवाडीतील युवकाच्या शोधात
सांखळी / प्रतिनिधी
कुडणे…डिचोली येथील शैला संजय घाडी (५५) या महिलेचा खूनझाला असून यात संशयित म्हणून सावंतवाडी (महाराष्ट्र) तालुक्यातील एका युवकाच्या शोधात डाचोली पोलीस आहेत. सागर रावळ असे संशयिताचे नाव समजते… संशयिताने महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केले. त्या आधी तिला बेदम मारहाण केली. संशयित हा सदर महिलेचा ओळखीतला आहे. महिला मृत झाल्याचे पाहताच त्याने पळ काढला आणि नंतर महिलेच्या मुलीला फोन करून केलेल्या कृत्याची माहिती दिली.


