न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ३१ मे नंतर कारवाई

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठीची प्रकरणे सावंतवाडी नगरपरिषद, उरण नगरपरिषद आणि काही तुरळक ठिकाणी केवळ त्या त्या ठिकाणच्या मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अद्याप प्रलंबित आहेत.
या गंभीर विषयाच्या अनुषंगाने उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांची माजी राज्यमंत्री श्री. प्रविण भोसले आणि कामगार नेते श्री. संतोष पवार, कार्याध्यक्ष म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन यांनी एक्स्प्रेस टॉवर येथे भेट घेतली.
सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय, मा. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, तसेच नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे स्पष्ट आदेश असतानाही विनाकारण दिरंगाई होत असल्याचे शिष्टमंडळाने मंत्री श्री. सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले.
याची तात्काळ दखल घेत मंत्री श्री. उदय सामंत यांनी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय श्री. अभिषेक कृष्णा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, “संबंधित अधिकारी विनाकारण अडवणूक करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर 31 मे 2026 नंतर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल.”
या बैठकीस सावंतवाडी नगरपरिषदेचे सफाई कामगारांचे वारस श्री. गोपाळ नामदेव सावंत, श्री. सुनिल नारायण परब, श्री. नितीन सदानंद कदम आणि श्री. संदीप पाटील उपस्थित होते. त्यांनी आपली व्यथा मंत्र्यांसमोर मांडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे