न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पिंकी माळी आणि दिलीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई/

बारामती विमान अपघातामध्ये 29 वर्षीय पिंकी माळी या फ्लाइट अटेंडंटचा यांचा मृत्यू झाला आहे. तिच्या निधनाची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले. पिंकीचे पार्थिव प्रथम तिच्या सासरी कळवा येथे अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. तेथे तिच्या पती सोमकर यांनी अंत्यदर्शन घेतले. हे जोडपे तीन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले होते. पिंकीच्या आवडीनुसार तिचा पती कळवा येथे फर्निचरचा व्यवसाय करत होता. दोघेही सोसायटीतील कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असत आणि सर्वांशी मिळून-मिसळून राहत. रहिवाशांकडून त्यांच्या जोडीचे नेहमी कौतुक होत असे.

 

पिंकीच्या पार्थिवाला नंतर तिच्या माहेरी वरळी येथे नेण्यात आले. तेथे तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. पती सोमकर यांना हे दुःख पचवणे अत्यंत कठीण जात आहे. पिंकीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोक व्यक्त केला. तिच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. जड अंत: करणाने तिला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

विदीप जाधव यांचे पार्थिव तरडगावात

अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील तरडगाव (फलटण तालुका) येथे नेण्यात आले आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी अपघाताने अनेकांना धक्का बसला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे