उपरकर शुटींग रेंजच्या साईश ची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नेमबाजी स्पर्धेसाठी निवड… मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये सुवर्णपदक
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
मेरठ,उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नेमबाजी स्पर्धेसाठी साईश दिगंबर तळणकर हा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मुंबई युनिव्हर्सिटी चे प्रतिनिधित्व करणार आहे. मुळ दोडामार्ग तालुक्यातील रहिवासी व सध्या मळगाव येथे राहून उपरकर शूटिंग अकॅडमी येथे नेमबाजीचा सराव करत आहे.
वेंगुर्ला येथे झालेल्या झोनल स्पर्धेतून त्याची निवड युनिव्हर्सिटी नेमबाजी स्पर्धेसाठी झाली होती. मुंबई युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये 600 पैकी 562 गुणांची नोंद करत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करून सुवर्ण पदक पटकाविले. या उत्कृष्ट कामगिरी च्या जोरावर त्याची निवड वैयक्तिक गटात झालीच त्याशिवाय सांघिक व मिक्स गटातही झाली आहे.त्याने यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व केले होते.त्याला उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण मिळाले तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अॅड. विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या निवडी बद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.


