खुल्या प्रवर्गातील अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांची कोलगाव मतदार संघात प्रचारात जोरदार मुसंडी
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी,
कोलगांव जि. प. मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा व शिवसेनेच्या कोलगांव पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार सौ. प्रणाली टिळवे व कारिवडे पं. स. पदाच्या उमेदवार समिता महेश सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल कोलगाव, कुणकेरी व आंबेगाव च्या ग्रामदेवतांना श्रीफळ ठेवून करण्यात आला. आज कारिवडे गावच्या ग्रामदैवतेला असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेवून प्रचार शुभारंभ झाला.
आज कारिवाडे येथे प्रचार शुभारंभ झाल्यावर असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये घरोघरी प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली. चारही गावांमध्ये प्रचाराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने गावागावांमध्ये अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांचा झंजावात दिसून येत आहे.
या मतदारसंघात मायकल डिसोझा यांचे मतदारांशी असलेले सौदाहार्य पूर्ण संबंध तसेच त्यांचा मनमिळावू स्वभाव यामुळे मतदारांचा पाठिंबा त्यांना वाढताना


