न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

डोंगरपाल येथे रविवारी सिद्ध महापुरुष भंडारा उत्सव

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

डोंगरपाल येथील श्री सिद्ध महापुरुष भंडारा उत्सव माघ पौर्णिमा रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १ रोजी सकाळी १० वा. पुजा अर्चा व धार्मिक विधी, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ डोंगरपाल ग्रामस्थ, महिला व इच्छुक भाविकांचे भजन, सायं ४ ते ५ श्री स्वामी समर्थ मठ, डोंगरपाल यांचा हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ नवस करणे, नवस फेडणे, रात्रौ ८ ते ९ सुश्राव्य भजन, रात्रौ ९ ते ११ पर्यंत पावणी, रात्रौ ११ नंतर भंडारा (महाप्रसाद) आदी कार्यक्रम होणार आहेत.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी डोंगरपाल सिद्धाच्या डोंगरावर एका सिद्ध योगी महापुरुषाने जिवंत समाधी घेतली होती.या ठिकाणी भंडारा पौर्णिमेला दरवर्षी भंडारा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला महाराष्ट्र तसेच गोव्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस करण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी, मानकरी आणि डोंगरपाल ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे