न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुनावणी लवकरच….. कर्नाटक सीमा आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश…. मात्र महाराष्ट्र शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

बेंगळुरू/ विनुथा के आर 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे, कर्नाटकने तयारी सुरु केली असून कर्नाटक सीमा आणि नद्या संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास यांची नियुक्ती केली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाबाबतच्या उच्चाधिकार समितीची फेररचना करण्यात येऊन खासदार धैर्यशील माने यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कन्नड संघटनांनी बेळगावात आंदोलन करत कर्नाटक सरकारचे सीमाप्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला होता. त्याची दखल घेत तातडीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.”
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमा आणि नद्या संरक्षण आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. कायदा तथा सीमा समन्वय मंत्री एच. के. पाटील हेच सारा कारभार पाहात होते. पण, कन्नड संघटनांनी वारंवार मागणी केल्यामुळे राज्य सरकारने बंगळूर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दास यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी जानेवारी महिन्यात सुनावणी होती. पण दावा पटलावर आला नाही. महाराष्ट्राने सुनावणी लवकर व्हावी, यासाठी अर्ज केला असून, आगामी काळात सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे. त्याआधी कर्नाटकाने सीमा आणि नद्या संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची निवड केली. एकीकडे कर्नाटक कामाला लागले असले, तरी महाराष्ट्र सरकारकडे वारंवार मागणी करुनही उच्चाधिकार समितीची बैठक होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे