न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या ‘संगीत संध्या’ कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

    सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘संगीत संध्या’ कार्यक्रम अत्यंत सुंदर, दर्जेदार आणि संस्मरणीय पद्धतीने पार पडला. या संगीतमयी मैफिलीत गायकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांमुळे चोखंदळ रसिक श्रोत्ये भारावून गेले. नवीन क्लबच्या पहिल्याच कार्यक्रमाला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद सम्राट क्लबच्या सांस्कृतिक प्रवासातील एक सुवर्णमयी टप्पा ठरला आहे.

या कार्यक्रमात हर्ष नकाशे, कु. विधिता केंकरे, ॲड. सिद्धी परब आणि सौ. स्मिता केंकरे यांनी आपल्या मधुर आणि बहारदार गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या संपूर्ण संगीत संध्येला सौ. प्रतिभा चव्हाण आणि गुरुप्रसाद चिटणीस यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालनाने विशेष रंगत आणली.

१४१ वर्षे पूर्ण झालेल्या ऐतिहासिक सालईवाडा सावंतवाडी २१ दिवशीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार सुनील राऊळ, मालवणी कवी दादा मडकईकर, संचालक कौस्तुभ पेडणेकर डॉ सोनल लेले, डॉ ज्ञानेश्वर ऐवळे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांचे या यशस्वी आयोजनाबद्दल विशेष कौतुक व अभिनंदन केले.

या प्रसंगी सावंतवाडी नगर परिषदेच्या नगरसेविका सुकन्या टोपले आणि पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सालईवाडा मंडळाचे अध्यक्ष राजू भाट, ज्येष्ठ पदाधिकारी बाळ नार्वेकर, विनोद सावंत, अमरनाथ सावंत भोसले, साबाजी नार्वेकर, कल्पना बांदेकर, यशवंत सावंत, मयुरी टोपले,नेहा भांगले, डॉ. सिद्धी ऐवळे, शीतल ऐवळे, वैभव केंकरे, सुचिता नकाशे, सानिका सासोलकर, सीताराम तेली, संजय नकाशे यांच्यासह अनेक मान्यवर व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“समोरासमोर चोखंदळ रसिक श्रोते उपस्थित असल्यामुळेच आमची गाणी थेट रसिकांच्या मनापर्यंत पोहोचू शकली,” अशी भावना व्यक्त करत कलाकारांनी समाधान व्यक्त केले. सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या सर्व सदस्यांनी आणि पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या प्रत्येक ‘सम्राटा’ने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे