न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दुष्काळ परिस्थितीत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात: उबाठा शिवसेनेचे आशिष सुभेदार 

 

सिंधुदुर्ग/  राजू तावडे 

 

सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाचा छायेत आहे तर आठही तालुक्यांमध्ये दुष्काळ जन्य परिस्थिती जाहीर झाली आहे. शासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात तसेच खरिप हंगाम पिक, भातशेती, बागायती यांच्या झालेल्या नुकसानिचे त्वरित पंचनामे करून त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

यावर्षी जिल्ह्यात बहुतांशी सगळीकडेच पाऊस कमी झाला आहे त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेले भात पीक करपले आहे. काही ठिकाणी पिकांना बहरच आलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हा जिल्हा दुष्काळ ग्रस्त भाग म्हणून शासनाने जाहीर केला आहे. तरी त्यावर योग्य त्या उपाययोजना करून शासनाने हे संकट थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. आवश्यक ठिकाणी बंधारे, बांध घालून पाणी अडवावे जेणेकरून पाण्याची समस्या कमी होईल. अजूनही पावसाचा हंगाम संपलेला नाही परतीचा पाऊस देखील अजून झालेला नाही परिणामी बंधारे घातल्यास पाणी अडवण्यास मदत होऊन काही प्रमाणात दिलासा मिळेल.

भात शेतीला पुरेसा पाऊस नसल्याने आणि तीव्र स्वरूपाच्या उन्हामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती करपून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार आहे. ठिकठिकाणी झालेल्या भात शेतीची मंत्री लोकप्रतिनिधी पाहणी करत आहेत. मात्र फक्त पाहणी करून काही होणार नाही तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झाली पाहिजे. असे मत सुभेदार यांनी व्यक्त केले आहे.

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्गात अद्याप भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरु झालेले नाहीत. अधिकारी, महसूल व कृषी विभाग या परिस्थीतीला अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सरकारने तातडीने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसमवेत सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे