श्री विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी व स्वर संगीत भजन मंडळ हरिचरणगिरी – कोंडूरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भजन स्पर्धांचे आयोजन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
श्री विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी तसेच
स्वर संगीत प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी – कोंडूरा यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. भजन स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही भजन स्पर्धा दिनांक २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रूपये ५०००/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस रुपये ४०००/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,
तृतीय बक्षीस रुपये ३०००/- तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. तर
उत्तेजनार्थ बक्षीस रुपये १०००/- तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट गायन , उत्कृष्ट संवादिनी, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट झान्ज, उत्कृष्ट कोरस यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल.
समाविष्ट सर्व भजन मंडळाना मानधन रुपये १०००/-, सन्मानचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी अंतिम भजन संपल्यावर करण्यात येईल.
भजन स्पर्धा प्रवेश मूल्य १०० रुपये आहे. भजन स्पर्धा नियमावली व अटी जाणून घेण्यासाठी आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी श्री. तुषार पेडणेकर 90822 69702 व श्री. नागेश तांडेल 82618 29540 त्यांच्याकडे करावी असे आवाहन श्री विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी तसेच स्वर संगीत प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी – कोंडूरा यांनी केले आहे.


