स्व. दिनकर धारणकर सरांची नाट्यचळवळ घराघरात पोचविणार …. युवा नेते विशाल परब
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
आज सोशल मिडिया, मालिका आणि बेबसिरीजच्या जमान्यात ही नाट्यचळवळ तुम्ही जिवंत ठेवली हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे नाट्यमहोत्सव भव्यदिव्य व यशस्वी होण्यासाठी योग्य मार्केटींगची आवश्यकता आहे. यापुढे मी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे पुढील वर्षीचा क्षितिज नाट्यमहोत्सव भव्यदिव्य करून स्व. दिनकर धारणकर सराची नाट्यक्रांती घराघरात पोचवूया व हीच स्व. दिनकर धारणकर यांना खरी आदरांजली ठरेल. असे प्रतिपादन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केले.
सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उद्घाटन भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्याहस्ते आज शुक्रवारी झाले. यावेळी विशाल परब बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक, स्व. धारणकर सरांचे सुपुत्र हर्षवर्धन धारणकर, चार्टर्ड अकाउंटंट लक्ष्मण नाईक, पत्रकार ॲड. संतोष सावंत, नगरसेवक तथा रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. निलम नाईक, सौ. सुनिता पेडणेकर, पत्रकार विनायक गांवस, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, सत्यजीत धारणकर, गुरु चिटणीस आदी उपस्थित होते.


