जगबुडीचे पाणी खेड मटण मार्केटमध्ये घुसले
रत्नागिरी/ प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या धोक्याची पातळी गाठत असून रात्री ९ घ्या सुमारास जगबुडी नदीचे पाणी खेड शहरातील मटण मार्केट मध्ये घुसले.
सध्या नगरपालिका कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेवून असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.


