न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजस्थान गुजरात सामना फिक्स?… दोनदा नाणेफेकीने संशय बळावला

चंदीगड/

गुजरात आणि राजस्थान यांच्यातील सामन्यादरम्यान झालेल्या नाणेफेकीनंतर  सोशल मीडियावर थेट ‘मॅच फिक्सिंग’चे आरोप केले जात आहेत. पहिल्यांदा टॉस जिंकूनही गुजरातला निर्णय घेता न आल्याने क्रिकेट चाहत्यांनी पंचांच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

सामन्याच्या सुरुवातीला गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणे हवेत उडवले आणि राजस्थानचा कर्णधार रियान परागने ‘छापा’ (Heads) अशी घोषणा केली. नाणे जमिनीवर पडले तेव्हा ‘काटा’ (Tails) आला होता. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या गुजरातने ही नाणेफेक जिंकली होती. मात्र, सामनाधिकारी  प्रकाश भट्ट यांनी आपल्याला रियान परागचे बोलणे स्पष्ट ऐकू आले नाही, असा दावा केला. स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा प्रचंड आवाज असल्यामुळे रियानने ‘छापा’ म्हटलं की ‘काटा’ हे ऐकू आले नाही, असे सांगत प्रकाश भट्ट यांनी पुन्हा नाणेफेक करण्याचा अजब निर्णय घेतला. यावेळी कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी पुन्हा एकदा नाणेफेक करण्यास सांगितले. दुसऱ्यांदा झालेल्या नाणेफेकीचा कौल मात्र राजस्थानच्या बाजूने लागला. रियान परागने टॉस जिंकून थेट प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

https://www.instagram.com/reel/DY7L6qFMEmh/?igsh=Nmthd2ZubjVhc3o1

 

https://www.instagram.com/reel/DY7L6qFMEmh/?igsh=Nmthd2ZubjVhc3o1

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे