न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गात गुटखा विक्री करणाऱ्या टपरीवर धाड… गुजराती मुस्लिम व्यापारी नजरेत

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

सिंधुदुर्गात गुटखा,पान मसाला संबंधी विक्रेत्यांवर अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार टप-यांवर धाड घालण्यात सुरवात झाली असून बकरी ईद संता नंतर आज सावंतवाडीत एका टपरीवर धाड घालण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार गुजराती मुस्लिम सावंतवाडीतून सिंधुदुर्ग,, रत्नागिरीत गुटखा,पान मसाला वितरण करतो… रत्नागिरी जिल्ह्यात गुजराती मुस्लिम व्यापारीच हा व्यापार करीत आहेत. बकरी ईद झाल्यानंतर आता संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

न्यूज 10 नेटवर्क ने दोन महिन्यांपूर्वी याबाबत बातमी दिली होती. केवळ काही पोलीसांना हाताशी धरून संबंधित मेमन हा गुटखा वितरीत करीत आहे. आणि ते विकणारे ७० टक्के गुजराती मुस्लिम आहेत. मराठी मुस्लिमांचा तीव्र विरोध होता. कॅन्सर चा शाप आपल्या कुटुंबाला नको म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी मुस्लिम व्यापारी आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा विक्री करीत नाहीत.

पालकमंत्री नितेश राणे यांनी या आधीच या बाबत आवाहन केले होते. या गुन्ह्यात कमित कमी दोन महिने तुरुंगवास असल्याने आणि या दोन महिन्याच्या आत बकरी ईद असल्याने कारवाईत शिथिलता आणली होती. मात्र आता आर एम.डी, विमल, यांचा पत्ता साफ होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इचलकरंजी जवळील कर्नाटकातील  गावात डुप्लिकेट आर एमडी हा पान मसाला बनतो आणि सिंधुदुर्ग, गोव्यात, कोल्हापूर,सांगलीत विक्री होतो. आता त्यालाही चाप बसणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे