आयपीएल विजेतेपदासाठी बेंगळुरू लढणार गुजरात बरोबर
चंदीगड/
कर्णधार गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. विजयासाठी दिलेल्या 215 धावांचं आव्हान तीन गडी गमवून पूर्ण केलं. यासह गुजरात टायटन्सचा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना होणार आहे. गुजरात टायटन्सने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे, तर एकदा पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आता आरसीबी आणि गुजरात यांच्यात कोण बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विजयी संघ या स्पर्धेत दुसऱ्यांदा जेतेपद मिळवणार आहे.


