झाडावरून पडलेल्या ओटवणेतील ‘त्या’ युवकाचे निधन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
मध काढण्यासाठी झाडावर चढलेल्याओटवणे-भटवाडी येथील एका ३९ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धेश नागेश कविटकर असे मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री हा अपघात घडला होता. त्यानंतर गोव्यातील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांना परिचित असलेल्या सिद्धेशच्या या अकाली निधनाने कविटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण ओटवणे गावावर शोककळा पसरली आहे.


