न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंती स्मरण पंधरवड्यानिमित्त रक्तदान शिबीर

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर 

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंती स्मरण पंधरवड्यानिमित्त भाजपा ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग व भाजपा ओरोस मंडलाच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालय, ओरोस येथे कार्यकर्ता संमेलन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिराचे उत्तघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे हस्ते करण्यात आले यामध्ये ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अनिल सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, ओरोस मंडल अध्यक्ष आनंद सावंत, जि. प. सदस्या सुप्रिया वालावलकर, पं. स. सदस्य अमित भोगले, नितीन महाडेश्वर,लॉरेन्स मान्येकर, मनीष पारकर,पप्या तवटे, दिनेश जैतापकर, आबा मुंज, कीर्तीकुमार तेरसे, विकास राऊळ, संजय लाड, आदेश नाईक,सुनील जाधव, सुशील निब्रे,गोपाल हरमलकर, सिद्धेश आगणे,शुभम परब, संतोष वालावलकर, दशरथ बापर्डेकर,आशु सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे