न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कर्नाटकात निवडणूक निकाल बदलणार… केवळ १६ मतांनी विजय

बंगळुरू/ विनूथा के आर

श्रृंगेरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतमोजणीत अन्याय झाल्याचा आरोप करत न्यायालयात गेलेल्या भाजपच्या डी. एन. जीवराज यांना अखेर विजय मिळाला आहे. त्यांनी काँग्रेसचे टी. जी. राजेगौडा यांचा पराभव केला. या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष जयनगर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे.

जयनगर विधानसभा मतदारसंघाचा निकाल आधीपासूनच न्यायालयीन वादात अडकलेला आहे. येथे काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांच्यावर भाजपचे सी. के. राममूर्ती यांनी केवळ 16 मतांच्या फरकाने विजय मिळविला होता.

राममूर्ती यांना 57,797 मते मिळाली होती, तर सौम्या रेड्डी यांना 57,781 मते मिळाली होती. मात्र, टपाली  मतांच्या मोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप करत सौम्या रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

827 टपाली मतांची फेरमोजणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, तसेच राममूर्ती यांची निवड रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. याप्रकरणात डीव्हीडी आणि पूरक कागदपत्रे पुरावा म्हणून स्वीकारण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र, या आदेशाविरोधात सी. के. राममूर्ती यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

उच्च न्यायालयाने याप्रकरणाची दररोज सुनावणी घेऊन एका महिन्यात निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणातील न्यायालयीन निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने येईल, असा विश्वास सौम्या रेड्डी आणि काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे