न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सौंदत्तीतील देवी बाबत अफवा… देवीचा कोप होऊन नाही तर सर्पदंशाने झाला दोन साधुंचा मृत्यू

बेळगांव/ गजानन बांदेकर 

लाखो भाविकांची आराध्य देवता असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी संदर्भात सध्या एक जोरदार खोटी माहिती पसरवली जात आहे. देवीचा प्रकोप झाल्याने सर्पदंश होऊन दोन भाविकांचा / साधूंचा मृत्यू झाला आहे. तसेच मूर्तीचा रंग काळा पडला आहे. अशा प्रकारच्या अनेक अफवा पसरविल्या जात आहे.

देवीचा प्रकोप शांत करण्यासाठी देवीच्या नावाने गळ्यात मणी बांधलेल्या महिलांनी सौंदत्ती देवस्थानाला भेट देवी अशा प्रकारचे खोटी माहिती पसरविली जात आहे.

यासंदर्भात सौंदत्ती रेणुका देवी देवस्थानाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. भाविकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये, अफेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे