न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

डी.जी बांदेकर ट्रस्ट, मार्फत २२ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय मोफत बाल उपक्रम शिबिर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

डी.जी बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी मार्फत सावंतवाडी येथे रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय मोफत बाल उपक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बालकांना Create • Learn • Play • Craft • Draw • Expression (निर्मिती • शिक्षण • खेळ • हस्तकला • चित्रकला • अभिव्यक्ती) याबाबत माहिती व प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक विशेष मोफत एक दिवसीय उपक्रम आहे. या शिबिराची वेळ रविवारी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० अशी असून या मध्ये ६ वर्षे व त्यावरील मुले मुलांना सहभागी होता येईल. शिबिराचा कालावधी दोन तासाचा असून हे शिबिर बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईल आर्ट सावंतवाडी येथे घेण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये मुलांना विविध सर्जनशील आणि शैक्षणिक कृतींमधून स्वतःची अभिव्यक्ती मांडण्याची संधी मिळणार आहे. चित्रकला, हस्तकला, मजेदार खेळ, शिकत-खेळत उपक्रम अशा विविध आकर्षक कार्यक्रमांचा समावेश असेल. नोंदणीची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुक पालकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी ७५८८१०९९० / ९४०५८३०२८८ या संपर्क क्रमांकावर करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे