न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

घावळनेतील मठात श्री स्वामी समर्थांनी वापरलेल्या मुळ चर्म पादुकांच्या दर्शन सोहळा २० फेब्रुवारी पासून

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या वापरलेल्या मुळ चर्म पादुकांचे दर्शन कासमळा घावनळे येथील मठात २० फेब्रुवारीपासून होणार आहे. या निमित्ताने २०ते २६ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता पादुकांचे आगमन आणि भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी ८वा. पावशीतील श्री सातेरी देवी महिला दशावतार मंडळाचा.. भक्तांची पाठिराखी आदीमाया हा नाट्यप्रयोग होणार आहे.

दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळ. पासून धार्मिक कार्यक्रम..व रात्री ८ वाजता डबलबारी

दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, मुळ पादुका पूजन व  रात्री ७ वा हरिपाठ व रात्री ८ वाजता अमृतनाथ द.शा. नाट्यम़डंळाचा लेक माझी तुळजाभवानी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.

दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम. वर्धापनदिनानिमित्त मुर्तीला महास्तकाभिषेक सायंकाळी ६ वा. तबला सोलो,७वा. पालखी सेवा व रात्री ९ वाजता भाई कलिंगण श्री कलेश्वर व.शा. मंडळाचा ट्रिकसिन्स युक्त जोगुलांबा अर्थात कालसर्प भैरवी हा नाट्यप्रयोग होणार आहे.

दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी मुळ चर्म पादुकांचे पूजन.. विविध धार्मिक कार्यक्रम व रात्री ८ वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम. सामुहीक पादुका पुजा व रात्री ८ वाजता श्री सवरेश्वर द.शा. नाट्य मंडळाचा श्रीक्षेत्र गाणगापूर हा नाट्यप्रयोग होणार आहे.

दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सांगता.. सत्यनारायण महापूजा, नैवेद्य व आरती रात्री ७ वाजता गोपाळ काला व रात्री ८ वाजता जय हनुमान द.शा. मंडळाचा दख्खनचा राजा ज्योतिबा माझा हा नाट्यप्रयोग होणार आहे.

वरील कालावधीत रोज दुपारी १२ते ३ व रात्री ८ ते १० महाप्रसाद दिला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरती व किर्तन, नामस्मरण असणार आहे.हे कार्यक्रम चोळप्पा महाराजांचे ५ वे वंशज वेदमूर्ती नितीन प्रभाकर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.तरी या दर्शन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे