शिर्डीजवळ एसटी बसचा भीषण अपघात, २ठार १५ जण जखमी
अहिल्यानगर/
शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळ बस आणि एर्टिगा कार यांच्यात हा अपघात झाला आहे. अपघातात दोन जण ठार तर १५जण जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. तर एसटी बसचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात एवढा भीषण होता की कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण १५ जण जखमी झाले आहेत.
शिर्डी जवळील सावळीविहीर हद्दीत अपघाताची ही घटना घडली आहे. अपघातग्रस्त बस पनवेलवरून शिर्डीला जात होती. तर अपघातग्रस्त कार नाशिकला जात होती. अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी तसेच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात साथ दिली.


