सांगेली येथे मंगळवारी वीज ग्राहक संघटनेची बैठक
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सांगेली वीज उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील विजेच्या विविध समस्याबाबत वीज ग्राहक संघटनेची बैठक मंगळवार दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजता सांगेली पाणलोट सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी, वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या तसेच महावितरणच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय आगामी आंदोलनाची दिशा, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण आणि गावागावांत संघटना बळकट करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीसाठी ग्राहकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात आणायचे आहेत.
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, समन्वयक अँड नंदन वेंगुर्लेकर, सचिव तुकाराम म्हापसेकर, मीडिया प्रमुख मनोज घाटकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संतोष तावडे, सावंतवाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, महावितरणचे सावंतवाडीचे उपअभियंता शैलेंद्र राक्षे, सहाय्यक अभियंता श्री बागवान आदी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला आंबोली, चौकुळ, गेळे, कुंभवडे, पारपोली, देवसू दाणोली, केसरी, फणसवडे, सातुळी, बावळाट, माडखोल,कुणकेरी,आंबेगाव , सांगेली, ओवळीये, सावरवाड, वेर्ले, शिरशिंगे, कलंबिस्त गावातील लोकप्रतिनिधीसह ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी केले आहे.


