न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बँकेच्या कॉलसाठी…सर्विस व सेवा कॉल्स साठी 1600312838 क्रमांकावरूनच संपर्क अधिकृत क्रमांक निश्चित

 

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर

 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्वांनुसार ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध प्रकारच्या दूरध्वनी संपर्कासाठी अधिकृत क्रमांक निश्चित केले आहेत, अशी माहिती बँक प्रशासनाने दिली.

 

मार्केटिंग व प्रचारासाठी स्वतंत्र क्रमांक

बँकेच्या योजना, नवीन उत्पादने, ऑफर्स तसेच प्रचारात्मक संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1409345238हा बँकेचा अधिकृत क्रमांक वापरण्यात येणार आहे. बँकेच्या मार्केटिंग विभागामार्फत या क्रमांकावरूनच ग्राहकांना कॉल करण्यात येतील. त्यामुळे योजनांबाबतची माहिती याच अधिकृत क्रमांकावरून दिली जाईल.

 

सेवा व कर्जवसुलीसाठी स्वतंत्र क्रमांक

ग्राहक सेवा व कर्जवसुलीसंदर्भातील कॉलसाठी *1600312838* हा बँकेचा अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. कर्जवसुलीच्या प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना त्यांच्या थकीत रकमेची माहिती, परतफेडीचे पर्याय तसेच बँकेचे दैनंदिन कामकाजा संदर्भात उदाहरणार्थ KYC, Dormant Reactive इत्यादी बाबतीत ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी या क्रमांकाचा वापर केला जाणार आहे. हे कॉल AI तसेच Dialer मार्फत करण्यात येतात.

 

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि बँकेशी संबंधित संवाद अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हे अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांनी बँकेच्या नावाने येणाऱ्या अनधिकृत किंवा संशयास्पद कॉल्सपासून सावध राहावे आणि बँकेशी संबंधित कॉलची खातरजमा करण्यासाठी वरील अधिकृत क्रमांकांची नोंद ठेवावी, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे