न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

उबाठा शिवसेनेच्या सावंतवाडी मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची फेरनिवड

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेना पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची फेरनिवड केली आहे. युवासेनेचे आक्रमक नेते सुशांत नाईक यांच्यावर कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

सिंधुदुर्गातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कार्यरत व्हावे, अशा सूचनाही पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये सावंतवाडी मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीविरोधात जोरदार लढा उभारण्यात रुपेश राऊळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर करणे, विविध निवडणुकांमध्ये सक्षम उमेदवार रिंगणात उतरवणे आणि कोणतीही जागा बिनविरोध होऊ न देणे, या त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा एकदा सावंतवाडी मतदारसंघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

या नव्या नियुक्त्यांमुळे सिंधुदुर्गातील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढणार असून, आगामी निवडणुकांमध्ये सावंतवाडी आणि कणकवली या दोन्ही मतदारसंघांमध्ये राजकीय चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे