न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बार्शीत मुख्याध्यापकाने कुटूंबाला संपवून स्वतः केली आत्महत्या

सोलापूर/

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकाने आधी आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं, आणि त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

योगेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुख्यध्यापकाचं नाव आहे, योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अथर्व आणि शिवांश पाटील यांची हत्या केली, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अर्थव पाटील आणि शिवांश पाटील यांना विष दिलं, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील आत्महत्या केली.

बार्शी तालुक्यातील हत्तीज गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांना शेअर मार्केटचा नाद होता. त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र त्यांना शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान झालं.शेअर मार्केटमुळे त्यांच्या डोक्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचं कर्ज झालं. याच कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे