मोती तलावात आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर…
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी मोती तलावात आत्महत्या केलेल्या निशाचे रोहन यांच्या बरोबर सततच कॉल वरून वाद होत होते… असे पोलिस तपासात उघड झाले आहे
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, निशा आणि रोहन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. निशा सध्या दहावीच्या वर्गात असल्याने तिच्या पालकांनी तिला अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्यास सांगितले होते. दरम्यान, रोहनकडून निशाला वारंवार फोन आणि मेसेज येत असल्याने निशाने त्याला सातत्याने संपर्क करून त्रास देऊ नये, असे सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर निशाने रोहनचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
रोहन हा मुंबईतील नालासोपारा येथून शनिवारी सावंतवाडीत आला होता. निशाने त्याला चिटणीस नाका येथे भेटण्यासाठी बोलावले होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. यापुढे मला फोन किंवा मेसेज करू नकोस, असे निशाने रोहनला स्पष्टपणे सांगितल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
या वादानंतर दोघांमधील परिस्थिती आणखी चिघळली. निशाने रोहनला तेथून निघून जाण्यास सांगितले. तसेच, अन्यथा आपण तलावात उडी घेऊ, असा इशाराही तिने दिल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेनंतर रोहन तेथून निघून गेला.
काही वेळानंतर रोहन तेथून निघून गेल्यानंतर निशाने तलावात उडी घेतली. निशाने तलावात उडी घेतल्याचे लक्षात आल्यानंतर रोहनने तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने रोहनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी केली असता रोहनने घरातून निघताना आपल्याला नवीन नोकरी मिळाली असून, त्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले होते, अशी माहिती त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे.


