न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्था जिल्हाध्यक्ष पदी श्री.चंद्रशेखर उपरकर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर उपरकर निवड झाली असून संस्थेच्या कार्याध्यक्ष पदावर श्री. हरिश्चंद्र खोबरेकर तर सरचिटणीस म्हणून श्री. महेंद्र पराडकर यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय एकूण 17 सदसीय्य पदाधिकारी मंडळामध्ये श्री. मेघनाद धुरी- सहचिटणीस, सौ. पूजा सरकारे- सहचिटणीस, श्री. पांडुरंग कोचरेकर- खजिनदार, श्री. दिपक तारी -हिशोब तपासनीस, डॉ. प्रमोद कोळंबकर -सदस्य, श्री. शंकर ऊर्फ दादा वाघ,-सदस्य, श्री. संजय बांदेकर, सौ. स्नेहा केरकर, सौ. सेजल परब, श्री. पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, श्री. संजय केळुस्कर, श्री. मिथुन मालंडकर, व श्री. नरेश हुले यांची कार्यकारी मंडळाचे विश्वस्थ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

मालवण येथील गाबीत समाज नागरी पतसंस्था हॉल येथे नुकतीच गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची बैठक संपन्न झाली. यावेळी नूतन विश्वस्थ मंडळाची पदाधिकारी व कार्यकारी मंडळाची निवड घोषित करण्यात आली. यावेळी मालवण नगरपालिकेचे नगरसेवक श्री. सहदेव बापर्डेकर, व उपाध्यक्ष श्री. संजय पराडकर यांचेहस्ते श्री. चंद्रशेखर उपरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवगड तालुका सरचिटणीस श्री. लक्षुमण तारी, श्री. बाळा मुणगेकर, श्री. रमेश तारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना देवगड तालुका गाबीत संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय पराडकर यांनी श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणून गेली 3 वर्षे सातत्याने केलेल्या गाबीत समाज संस्थेच्या सर्वंकष कामगिरी बद्दल प्रशंसा केली. यापूर्वी सुद्धा गाबीत समाजाचे जिल्हा संघटक म्हणूनही त्यांनी गेली 25 वर्षे काम केले असून गाबीत समाजासाठी भरीव असे योगदान दिले आहे. गाबीत समाज हा मच्छिमारी व पर्यटन व्यवसायामध्ये असून त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन संस्था,रापण मच्छिमार संघटना, महिला मच्छिमार संघटना, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबीरे, मेळावे, विविध आंदोलने,मोर्चे, गाबीत महोत्सव,या माध्यमातून गाबीत समाजाच्या विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठविला असल्यामुळे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य सर्वाना मिळत आहे.

जिल्हाध्यक्ष म्हणून बोलताना श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी येत्या गणेश चतुर्थी नंतर जिल्हा कार्यकारी मंडळासह गाबीत समाजाच्या वस्ती असलेल्या किनारपट्टी व इतर गावामध्ये संपर्क दौरा आयोजित करून गाबीत समाजाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले.

शेवटी श्री. महेंद्र पराडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे